लोकशाहीविरुद्ध उठणारी वादळे
अधीरपणाने, अति उत्साहाने, धीर गमावून लोक स्वत:च्या विवेकशक्तीपासून दूर होतात हे कबूल. विलंबानेसुद्धा लोक चिडतात हे खरे. वश होण्याची वृत्ती प्रत्येकात थोडीबहुत असते हेसुद्धा खरे असू शकेल. परंतु म्हणून काही प्रत्येकाने कोणा एका सर्वोच्च नेत्याच्या ताब्यात जाण्याचा उत्साह दाखवण्याची गरज नाही. सर्वाधिकारशाहीचा आसरा घेण्याने तऱ्हेतऱ्हेचे धोके आणि जुलूम प्रजेच्या बोकांडी बसतात.......